Shree Gajanan Vijay Granth

अध्याय १ (Adhyay/Chapter 1)

शेगावी माघमासी I वद्य सप्तमी ज्या दिवशी I
हा उदय पावला ज्ञानराशी I पदनताते तारावया II
या अध्यायामधील सारांश :- श्री गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीतील शीते वेचून खात आहे.

अध्याय २ (Adhyay/Chapter 2)

‘गण गण’ हे त्यांचे भजन I हमेशा चाले म्हणून I
लोकांनी दिले अभिधान I गजानन हे तयाला II
या अध्यायामधील सारांश :- श्री गजानन महाराज बन्कटलालचे घरी

अध्याय 3 (Adhyay/Chapter 3)

जय जय अवलिया गजानना I हे नरदेहधारी नारायणा I
अविनाशरूपा आनंदघना I परत्परा जगत्पते II
या अध्यायामधील सारांश :- श्री गजानन महाराजांच्या तीर्थाने जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले.

अध्याय 4 (Adhyay/Chapter 4)

या गजानन रूपी जमिनीत I जे जे काही पेराल सत्य I
ते ते मिळणार आहे परत I बहूत होऊन तुम्हाला II
या अध्यायामधील सारांश :- श्री गजानन महाराजांच्या चिलमी जवळ बंकटलालाने काडी धरताच चिलीम पेटली.

अध्याय 5 (Adhyay/Chapter 5)

श्रीगजाननलीलेचा I पार कधी न लागायचा I
अंबरीच्या चांदण्यांचा I हिशेब कोणा न लागे कधी II
या अध्यायामधील सारांश :- श्रीगजानन महाराजांनी कोरड्या विहिरित पाणी उत्पन्न केले. भास्कर पाटील क्षमा मागतो.

अध्याय 6 (Adhyay/Chapter 6)

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी I स्थिरचर व्यापून उरले जे या जगतासी I
ते तू तत्व खरोखर नि:संशय अससी I लीलामात्रे धरीले मानवदेहासी II
या अध्यायामधील सारांश :- श्रीगजानन महाराजांच्या जवळ कणसे टाकून मधमाशांना भिऊन पळून जाणारे लोक.

अध्याय 7 (Adhyay/Chapter 7)

हा वृषभ देव भागवतीचा I किंवा शुकाचार्य साचा I
किंवा वामदेवाचा I हा दुसरा अवतार II
या अध्यायामधील सारांश :- श्री गजानन महाराजांना मुले ऊसाने मारीत आहेत.

अध्याय 8 (Adhyay/Chapter 8)

क्षणात जल आणिले नसून थेंब त्या वापिला I क्षणात गमनाप्रती करिसी इच्छीलेल्या स्थला I
क्षणात स्वरुपे किती विविध धारिसी धीवरा I करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा II
या अध्यायामधील सारांश :- श्री गजानन महाराजांस गोसावी भेटण्यास आले आहेत.

अध्याय 9 (Adhyay/Chapter 9)

गजाननपदी निष्ठा ठेवा I सुख-अनुभव सर्वदा घ्यावा I
कुतर्कासी मुळी न द्यावा I ठाव आपूल्या मानसी II
या अध्यायामधील सारांश :- श्रीगजानन महाराज घोड्याच्या चौखुरात निजले आहेत. त्यामुळे घोडा वठणीवर आला.

अध्याय 10 (Adhyay/Chapter 10)

ज्याची निष्ठा बसेल I वा! जो माझा असेल I
त्याचेच कार्य होईल I इतरांची ना जरूर मला II
या अध्यायामधील सारांश :- श्रीगजानन महाराजांचे दर्शन होताच गाय गरीब झाली.

अध्याय 11 (Adhyay/Chapter 11)

सुर्याप्रमाणे सतेज कांति I आजानुबाहु निश्चिती I
दृष्टी नासाग्राच्या वरती I स्थिर जायची झाली असे II
या अध्यायामधील सारांश :- श्रीगजानन महाराजांनी कवळ्यान्ना यथेच्छ खाउ दिले व पुन्हा न येण्यास सांगितले.

अध्याय 12 (Adhyay/Chapter 12)

कधी गणगणाचे भजन I कधी धरावे नुसते मौन I
कधी राहावे पडून I शय्येवरी निचेष्ठित II
या अध्यायामधील सारांश :- श्रीगजानन महाराजांचा, पिताम्बराने धावा करताच वळलेल्या वृक्षाला पालवी फुटली.

अध्याय 13 (Adhyay/Chapter 13)

शेगावचे पौरवासी I परम भाग्याचे निश्चयेसी I
म्हणून लाधले तयासी I गजानन हे संत रत्न II
या अध्यायामधील सारांश :- श्रीगजानन महाराजांच्या प्रसादाने महारोगी सुध्दा बरे झाले.

अध्याय 14 (Adhyay/Chapter 14)

तूच सोवळा साचार I एक आहेस भुमिवर I
करण्या जगाचा उद्धार I तुम्हा धडिले ईश्वराने II
या अध्यायामधील सारांश :- श्रीगजानन महाराजांच्या कृपेने प्रत्यक्ष नर्मदा देवीने सर्वांचे रक्षण केले.

अध्याय 15 (Adhyay/Chapter 15)

गजानन गुणागरा परम मंगला पावना I अशीच अवघे हरी दुरित तेवि दुर्वासना I
नसे त्रिभुवनामध्ये तुजविणे आम्हा आसरा I करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा II
या अध्यायामधील सारांश :- श्री गजानन महाराज उजव्या बाजूस बसले असून लोकमान्य टिळक भाषण करीत आहेत.

अध्याय 16 (Adhyay/Chapter 16)

सवे शिष्य अपार I बसले होते मंडलाकार I
ते शिष्य नव्हते किरणे थोर I त्या गजानन भास्करची II
या अध्यायामधील सारांश :- श्रीगजानन महाराजांना कवरपुत्र त्र्यंबक कांदा भाकरीचे जेवण देत आहे.

अध्याय 17 (Adhyay/Chapter 17)

ते पूर्ण ब्रह्म जागचालक ज्ञानराशी I ऐसे युगायुगी किती अवतार घेसी I
झाल्यास दर्शन तुझे, भय रोग चिंता I नासे गजाननगुरो! मज पाव आता II
या अध्यायामधील सारांश :- श्रीगजानन महाराज बायकांच्या डब्यातून खाली येऊन बसले. स्टेशन मास्तर त्यांची विनवणी करीत आहे.

अध्याय 18 (Adhyay/Chapter 18)

‘गण गण गणात बोते’ I हे भजन प्रिय सद्गुरुते I या श्रेष्ठ गजानन गुरुते I
तुम्ही आठवीत रहा याते II
या अध्यायामधील सारांश :- श्रीगजानन महाराजांनी पांढरीस बापूना काळ्यास विठ्ठल स्वरुपात दर्शन दिले.

अध्याय 19 (Adhyay/Chapter 19)

मी गेलो ऐसे मानू नका I भक्तित अंतर करू नका I
कदा मजलागी विसरू नका I मी आहे येथेच II
या अध्यायामधील सारांश :- श्री गजानन महाराज हरी पटलाना घेऊन श्री विठ्ठलास भेटवायास पंढरीला गेले.

अध्याय 20 (Adhyay/Chapter 20)

ओम नमो सद्गुरू श्रीगजाननबाबा I ओम नमो भगवते श्रीगजाननबाबा II
या अध्यायामधील सारांश :- श्री गजानन महाराजांनी लक्ष्मण हरी जांजळ यास बोरी बंदरावर परमहंसाच्या रूपात भेट दिली.

अध्याय 21 (Adhyay/Chapter 21)

श्री गजानन स्वामी-चरित I जो नियमे वाचील सत्य I त्याचे पुरतील मनोरथ I श्रीगजाननकृपेने II
दशमी एकादशी द्वादशीला I हा ग्रंथ जो वाची भला I अनुपम येईल भाग्य त्याला I श्रीगजाननकृपेने II
या अध्यायामधील सारांश :- श्री गजानन महाराज गोसाव्याच्या वेषात रामचंद्र पाटलास दर्शन देत आहे.