Gajanan Maharaj Bhakta Parivar

Events Gallery

“Gajanan Maharaj Bhakta Parivar, USA” celebrates Prakatdin, Guru purnima and Rishi Panchami on a huge scale. Apart from these three big events, the Parivar also offers monthly prayers at Shree Mauli’s holy feet. These prayer events are commonly known as ‘Upasana’. Every month, one of the Parivar devotees hosts the Upasana. Generally, about 100 people attend the Upasana. The MahaPrasad is taken care by devotees in the potluck pattern.

Prakat Din Celebration: 22 Feb 2025
Click here to see photos
जय गजानन 🙏🏻 दर वर्षी वाटतं की ह्या वर्षीचा प्रकटदिनाचा सोहळा जास्त छान झाला. पण ह्या वर्षीचा सोहळा खरच अवर्णनीय झाला. दोन महिन्यांपासून सुरु असलेले planning अगदी अप्रतिम रीत्या execute झाले. Decoration आणि वस्त्रालंकार teams ने श्री महाराजांचे प्रगटदिनाचे पैठणीचे वस्त्र finalize केले आणि वस्त्रालंकार team ने ते शिवुन ready ठेवले. प्रकटदिन गुरुवार, दिनांक २० फेब्रुवारी, २०२५ ला होता. गुरुवार सकाळपासूनच भक्त श्री माऊलींचे दर्शन घ्यायला येणार, हे गेल्या वर्षीच्या अनुभवामुळे स्पष्टच होते. त्यामुळे त्याआधी श्री महाराजांचा श्रृंगार करायचा होता. म्हणून बुधवारी संध्याकाळी श्री महाराजांना मंगलस्नान घालुन पैठणीचे शिवलेले सुंदर वस्त्र, त्याला साजेसे झब्बा, फेटा आणि हार घालण्यात आले. गुरुवारी श्री महाराजांच्या आरतीला बऱ्याच भक्तांची उपस्थिती होती. मोगऱ्याचा हार लेवुन श्री महाराज आपल्या भक्तांना भेटण्यासाठी बसले होते. सकाळपासून येणाऱ्या भक्तांना प्रसादात आपल्याच गुरु भगिनींनी करून आणलेले मोदक आणि काला जामुन वाटण्यात आले. आरतीच्या वेळी श्री गजानन बावन्नी आणि ‘गणी गण गणांत बोते’ हा नामजप घेतला. आरतीला आलेल्या सर्व भक्तांना आपल्या गुरुभागिनींनी केलेल्या महाप्रसादाचे boxes वाटण्यात आले. Decoration team ने गुरुवारपासूनच Decoration ला सुरुवात केली होती. श्री महाराजांच्या वस्त्राला contrast backdrop पासून ते श्री महाराजांच्या मूर्तीची प्रकाशव्यवस्था आणि आजूबाजूचे पाण्याचे decoration वगैरेपर्यंत सर्वच गोष्टी अगदी विचार करून केल्या होत्या. शनिवारच्या उत्सवासाठी आपल्याच एका सेवेकरी भगिनीने स्वतः श्री महाराजांसाठी घसघसीत मोठा हार बनवून आणला होता आणि तो महाराजांवर खरेच उठून दिसत होता. श्री महाराजांसमोर खाण्याचे पदार्थ छान bowls मध्ये मांडून ठेवले होते. साधारण एकच्या सुमारास श्रींचे पादुका आगमन झाले आणि सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले. Maryland, Washington DC, Florida, अशा लांब लांबच्या प्रांतातुन लोक आले होते. शनिवारी सकाळी पालखी assemble केली आणि दुपारी ती छान सजवली. त्यात श्री महाराजांची मूर्ती आणि photo secure करून ठेवले. भक्तांना पारायण करायला वेगळ्या पारायण कक्षाची उत्तम सोय केली होती. त्यात श्री महाराजांचा छान मोठा photo ठेवून पारायण करणाऱ्यांना खुर्च्यांवर आणि खाली बसायची व्यवस्था केली होती. त्यामुळे अनेकांचे पारायण without any disturbance संपन्न झाले. एवढ्या लोकांच्या गाड्यांची व्यवस्था नीट व्हावी म्हणून मंदिराच्या समोरील Capt John T Dempster Sr. Fire Service Training Academy चे parking घेण्यात आले होते. ह्यावर्षी parking ची व्यवस्था अगदी विशेष होती. व्यवस्थित instructions चे फलक लावल्यामुळे ही self-sufficient arrangement खूपच छान जमुन आली. सकाळी group वर parking च्या सूचनांचा video आणि locations टाकले होते. त्यामुळे येणाऱ्या भक्तांना आपल्या बरोबरच्या लोकांना मंदिरात drop करुन, Fire Service Training Academy च्या parking lot मध्ये कार पार्क करुन परत मंदिरात येता येत होते. रस्ता cross करताना भक्तांना जलद गतीने येणाऱ्या वाहनांचा त्रास होऊ नये, म्हणून cop car उभी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. Parking च्या team ने केलेला हा parking automation चा प्रयत्न अनेकांनी वाखाणला. आलेल्या लोकांना काही माहिती हवी असेल तर त्यांना Welcome desk चे सेवेकरी ती माहिती पुरवायचे. ह्या सेवेकऱ्यांनी आपल्या nonprofit organization च्या (phone number, email id, website, इत्यादि) माहितीचे छोटे chits बनवून ठेवले होते. ज्यांना हवे होते त्यांना ते दिले गेले. एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्सव करायचा म्हटल्यावर काय लागत नाही… हळद कुंकवापासून ते आरतीची तबके आणि नैवेद्याच्या ताट वाट्यांपर्यंत सर्व गोष्टींची arrangement करायची असते. आपल्या admin / logistic team ने coat racks, shoe racks, महाप्रसादाचे boxes ठेवायला वेगळे racks, दिवसभरात लागणारी tables, वगैरे सकाळीच मंदिरात आणून ठेवले होते. पालखीच्या ६ प्रदक्षिणा करताना गुरुबंधूंच्या बरोबरीने गुरुभागिनींनी सुद्धा पालखी खांद्यावर मिरवली. प्रत्येक प्रदक्षिणेच्या शेवटी श्री महाराजांचे औक्षण व्हायचे. मध्ये गुरुभागिनी फेर धरुन फुगड्या घालत होत्या. ह्यावेळी पालखीच्या मिरवणुकीच्या वेळेस सर्वांचे लक्ष वेधले ते आपल्या impromptu लेझिम पथकाने! अगदी वेळेवर लेझिम arrange झाली आणि सर्वांच्या उत्साहात विलक्षण भर पडली. अगदी दोन मिनटांत practice करुन सर्वांनी लेझिम सुरेख चालवले. सर्वांचे coordination पाहून, ह्या सर्वांनी आधी एकत्र practice केली नाही हे कोणाला खरेच वाटले नसेल. भजनाच्या team ला ह्या वर्षी बऱ्याच challenges ना सामोरे जावे लागले. कोणी आजारी तर कोणी भारतात गेल्यामुळे यंदा श्री महाराजांच्या चरणी भजन सेवा अर्पण करू शकू की नाही इथपासुन सुरुवात होती. पण आपली भजनसेवा खंडित होऊ नये, ह्यासाठी ह्या team ने नेटाच प्रयत्न केला आणि तो श्री महाराजांच्या कृपेने यशस्वी झाला. मोजक्या म्हणजे फक्त २-३ practices करुन ह्या team ने मात्र बाजी मारली. त्यात आपल्या बालसेवेकऱ्यांनी keyboard वर भजनाला छान साथ दिली. ह्यावर्षी परत आपल्या गुरु भगिनींनी साडे चारशे लोकांच्या महाप्रसादाच्या जेवणाचा घाट घातला. Food team चे काम ढोबळमानाने चार टप्प्यांच्यात विभागले जाते - १. स्वयंपाक करणे २. शिजवलेले अन्न श्री सिद्धिविनायक मंदिरात आणणे आणि ३. Food boxes भरणे आणि ४. Food boxes वाटणे. दोन teams ने मिळून एक दिवस आधी 500 गुलाबजाम बनवून छोट्या डब्यांच्यात भरून ठेवले. एका गुरुभगिनीने एवढ्या लोकांचे पिठले केले. काहींनी ठेचा करुन आणला. पोळ्या आणि भाकऱ्या बाहेरून मागवल्या होत्या. श्री महाराजांसमोर ठेवायचे गोड आणि तिखट-मिठाचे पदार्थ भगिनींनी घरी बनवून आणले होते. सकाळी सव्वासात वाजता आपल्या भगिनी भाड्याने घेतलेल्या किचन मध्ये पोचल्या. चुलींचे हळद कुंकु लावून पूजन करून अन्नपूर्णेचा मंत्र म्हणून ह्या भगिनी ज्या कामाला लागल्या त्या साडेदहा पर्यंत भाजी आणि मसालेभात बनवून मोकळ्यासुद्धा झाल्या. मग ते सर्व जेवण डब्यात भरून मंदिरात आणण्यात आले. ते आणताना आपल्या गुरुबंधूंनी कोणत्या रस्त्याने गेले असता traffic चा त्रास होणार नाही आणि गाडी व्यवस्थित speed ने आणता येईल, ह्याचासुद्धा विचार केला. एक program successful होण्यासाठी कोणत्या पातळीवर विचार करावा लागतो, ह्याचा अंदाज यावा म्हणून हे मुद्दाम नमूद केले. जेवण आणल्यावर साडेचारशे boxes pack करायला दुसरी team तयारच होती. हे भरलेले महाप्रसादाचे boxes व्यवस्थित racks वर लावून ठेवले आणि जाताना प्रत्येक भक्ताला महाप्रसाद दिला. ह्या व्यतिरिक्त जवळच राहणाऱ्या एक गुरुबंधूंनी सेवेकऱ्यांच्या चहाची व्यवस्था केली. सकाळपासून घराबाहेर पडलेल्या सेवेकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्थासुद्धा आपल्या दोन गुरुभगिनींनी केली होती. आपल्या बाळगोपाळांसाठी एका गुरुभगिनीने 200 eggless cupcakes बनवून आणले होते. जेव्हा अष्टोत्ततरशत नामावलीच्या घोषात श्री महाराजांना आपल्या बालसेवेकऱ्यांकरवी पुष्पाभिषेक झाला, त्यावेळी cupcake दिल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. उपासनेच्या वेळी आपले बाल सेवेकरी बसलेल्या भक्तांना पाण्याच्या बाटल्या देत होते, रिकाम्या बाटल्या आणि इतर कचरा trash bag मध्ये गोळा करत होते आणि मध्ये मध्ये “माऊली शांतता राखा’ किंवा ‘माऊली नामजप करा’ अशा आशयाचे फलक घेऊन लोकांना सावधसुद्धा करत होते. दोन्ही slots मधील आरत्यांची व्यवस्था खूप छान केली होती. नेहमीच्या आरत्यांमध्ये देवीची, शंकराची आणि दत्ताची अशा तीन आरत्या वाढवल्या होत्या जेणेकरून उपस्थित असलेल्या सर्वांना श्री महाराजांना ओवाळण्याची संधी मिळावी. ह्या आरत्यांची PDF आपल्या group वर आरतीच्या आधी share केली होती. आरतीसाठी तीन रांगा केल्या होत्या. त्या रांगा आपले तीन गुरुबंधू control करत होते. ओवाळून झाले की भक्त आरतीचे तबक त्या रांगेतील controller बंधूला द्यायचे आणि मग ते पुढील भक्ताला ते तबक ओवाळण्यासाठी द्यायचे. अत्यंत शिस्तिच्या आणि भक्तिमय वातावरणात दोन्ही आरत्या पार पडल्या. जे भक्त प्रकटदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नव्हते त्यांच्यासाठी ह्या सर्व सोहळ्याचे थेट प्रक्षेपण YouTube Live वर चालू होते. संध्याकाळी प्रगटदिनाचा सर्व सोहळा पार पडल्यावर सर्व सेवेकऱ्यांनी सगळी आवराआवर केली. ह्या खेपेला श्रींच्या पादुका Maryland च्या भक्तांकडे गेल्या. संध्याकाळी सर्व आवरुन झाल्यावर जेवणाचे वेळी घरचे लग्नकार्य आवरल्यावर घरची मंडळी ज्या अनौपचारिकपणे गप्पा मारत जेवण करतात ना, तसा माहोल झाला होता. अशा प्रेमळ लोकांमुळेच तर हा परिवार छान चालू आहे. अनेक पातळ्यांवर चालू असलेले planning उत्तम प्रकारे execute व्हायला श्री महाराजांच्या कृपेबरोबरच जे selfless dedication लागते ना, ते आपल्या सर्व सेवेकऱ्यांमध्ये आहे. म्हणूनच एवढा मोठा event अगदी सहज पार पडतो. 🙏🏻 श्री गजानन जय गजानन 🙏🏻
Click here for Youtube link
Click here to see photos
Media Coverage
Click here to see photos
The articles around ‘Shree Gajanan Maharaj Bhakta Parivar, USA’ have been published in Indian local media, for last couple of years. Shree Gajanan Maharaj’s Prakatdin celebration in the year of 2020, was also broadcasted on TV Asia.
Click here to see photos
Upasana Events
Click here to see photos
Upasana (Chanting along with Shree Gajanan Maharaj’s prayers) is a popular monthly event organized by Shree Gajanan Maharaj Bhakta Parivar, USA. Every month, one of the Parivar members (Shree Gajanan Maharaj’s Devotees) hosts this event at their home. Mahaprasad dinner is prepared and brought by our Guru sisters. The Upasana has the theme of Indian and American festivals occurring in that respective month such as Thanksgiving, Holi, Diwali / Tulasi Wiwah, Datta Jayanti, Sankrant, Ram Navami, etc.
Click here for Youtube link
Click here to see photos
Prakat Din Celebration: 06 Mar 2021
Click here to see photos
‘Shree Gajanan Maharaj Bhakta Parivar, USA’ has celebrated Shree Gajanan Maharaj’s Prakatdin at Sri Radha Gopinath Temple, at Edison in New Jersey, USA. During COVID-19 era, no one was sure about how the Prakatdin celebration would work out within the controlled guidelines around social gatherings. Considering the huge loss of life due to COVID-19 in USA, the Parivar team was also unsure about the number of potential attendees. But by Shree Mauli’s grace, about 200 devotees visited in the pre-allocated time-slots and had Prasad. Some devotees came from different states despite of travel inconvenience due to the pandemic. Parivar team has followed the COVID-19 advisory protocol very well right from checking the temperature of visitors through maintaining safe distance. This was indeed a one of a kind Prakatdin Celebration.
Click here for Youtube link
Click here to see photos
Prakat Din Celebration: 15 Feb 2020
Click here to see photos
‘Shree Gajanan Maharaj Bhakta Parivar, USA’ has celebrated Shree Gajanan Maharaj’s Prakatdin at Sai Pariwar Temple, North Brunswick in New Jersey, USA. About 400 people attended the celebration. People travelled from several cities and states such as Philadelphia, Connecticut, Washington DC, Boston and Florida. This was the 4th year of this group celebrating Shree Gajanan Maharaj’s Prakatdin.
Click here for Youtube link
Click here to see photos
Prakat Din Celebration: 24 Feb 2019
Click here to see photos
Shree Gajanan Maharaj’s Prakatdin was celebrated at Sai Pariwar Temple, North Brunswick in New Jersey, USA by ‘Shree Gajanan Maharaj Bhakta Parivar, USA’. About 300 people attended the celebration. People travelled from several cities and states such as Philadelphia, Washington DC, Boston and Michigan. This was the 3rd year of this group celebrating Shree Gajanan Maharaj’s Prakatdin.
Click here for Youtube link
Click here to see photos
2019 Rishi Panchami
Click here to see photos
Rishi Panchami / Mahasamadhi utsav was celebrated on Sunday, September 8, 2019 in Plainsboro, New Jersey. Coincidentally, our beloved Mauli took Samadhi (left HIS material body and went in immense and intense meditative state) on the same day in the year of 1910. Over 125 people have arrived to chant Shree Maharaj’s prayers and to make this Mahasamadhi utsav a grand success.
Click here to see photos